जगातले प्रमुख धर्म तिरस्कार, संघर्ष आणि युद्ध यांविषयी काय म्हणतात?
घई यांनी जवळपास ५० वर्षे विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. त्यातून हे पुस्तक साकारले आहे. या पुस्तकामागची कल्पना सांगताना त्यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे – “…हे लहानसे संकलन प्रसिद्ध करण्यासाठी नेमकी हीच वेळ निवडण्यामागे आज जगात प्रचंड वाढत चाललेली धार्मिक असहिष्णुता हे कारण आहे.” गेल्या पंचवीस-तीस वर्षांत आणि विशेषत: गेल्या चार वर्षांत देशात आणि देशाबाहेरही धार्मिक असहिष्णुता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.......